।। श्री गणेशाय नमः।।
(चालः सुखकर्ता दुखहर्ता)
लंबोदर पितांबर, हा वक्रतुंड। विघ्न हराया आला, धावूनी सत्वर।। लाल फूल मस्तकी, मुकूट सुंदर। ओमकार दुमदुमे, हा करता ध्यान।।
जय देव जय देव जय मोरेश्वर। कार्यारंभी पूजिता देई सुखसौख्य जय देव जय देव।।
मोदक लाडू दुर्वा, आवडती फार। सुजनासह राहूनी दुष्टांचा, करी तू संहार।। देवाधिदेव, तू परमेश्वर। सकळां बुद्धी देई, आशीर्वादापर।। जय देव०।।
अनंत नामे तुझी, सगुण हे रुप। तुझे ध्यान करता मनास, येई हुरूप।। चिंता क्लेश सारे, होती ते दूर। भक्तांवर प्रेमाचा, करी तू वर्षाव।। जय देव०।।
तुझ्या दर्शनाने, मन होई शांत। तुझे नाम जपता घडे, निर्गुण साक्षात्कार।। अशीच कृपा राहो, आम्हा सकळांवर। तुझ्याशी एकरूप होण्याचा, मज द्यावा वर ।। जय देव०।।
No comments:
Post a Comment