Saturday, 2 June 2018

खरे श्रीमंत

मुक्याला आहे वाचा आणि अंधाला आहे दृष्टी,
पण सगळं काही असणारा जगात दुःखी कष्टी

सुंदर आहे आयुष्य जगा की मनमुराद,
वाट्याला येतील त्या क्षणांचा घ्या मनसोक्त आस्वाद

डोळे उघडे असणं म्हणजे बघणं नाही अन् बघणं म्हणजे डोळस असण नाही,
उडू देत की ह्या मनातल्या पक्षांना विस्तारलेल्या दिशांत दाही

कधी कधी जवळून न दिसणारं दुरून स्पष्ट दिसतं,
तर कधी दूर बघता बघता जवळ पहायचच राहतं

सोबतीला जीवाभावाचे चार जण असणं,
मग देवाला कौल लावून कशाला काही मागणं

मस्त आणि हसत रहा, दुःखं ही घाबरतील,
हे खरे श्रीमंत म्हणून माघारे फिरतील!

4 comments:

रंगलीला

रंगात रंगूनी सजला घन:श्याम सावळा ज्याने जसा रंगवला तसा तो उमटला वेगळा जरी रंग हे उतरले कुंचल्यातले भावविश्व रेखाटले हे अंतरातले ...